Maharashtra Govt Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असलात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र अंतर्गत शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन केंद्र अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 273 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई, सिंधुदुर्ग, गोंदीया, नागपूर,नंदुरबार, यवतमाळ, अकोला, लातूर, अंबेजोगाई, पुणे, धुळे येथे ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
प्रत्येक पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे. यासाठी 18 ते 69 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. प्राध्यापक पदासाठी 1 लाख 85 हजार ते 2 लाख 30 हजार रुपयापर्यंत पगार दिला जाईल. सहयोगी प्रध्यापक पदासाठी 1 लाख 70 हजार ते 2 लाख 10 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. सेवानिवृत अध्यापकांची निवड झाल्यास त्यांना शासन निर्णयानुसार मानधन दिले जाणार आहे.
तसेच काही नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असावा. नियुक्ती वेळेस उमेदवाराचे वय 69 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ही भरती विशिष्ट कालावधीसाठी करार पद्धतीने केली जाईल. संबंधित पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिलेली अर्हता पूर्ण करणारे, खासगी किंवा इतर क्षेत्रातील उमेदवार अर्ज करु शकतात.
25 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. ऑनलाईन अर्जासोबत उमेदवारांना संबंधीत महत्वाची कागदपत्रे जोडावी लागतील. मुलाखतीला येताना ही कागदपत्रे सोबत आणावी लागतील.
उमेदवार कामामध्ये समाधानकार नसल्यास, कामाप्रती गंभीर नसल्यास, अनियमितता, गैरवर्तणुक आढळल्यास त्याची उमेदवारी संपुष्टात आणण्यात येईल, याची नोंद घ्या. करार पद्धतीने नियुक्त उमेदवारांना पूर्णवेळ नियुक्तीचा कोणताही अधिकार राहणार नाही. नियुक्ती मिळाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत नोकरी सोडता येणार नाही. तसेच फक्त नैमित्तीक रजा मिळू शकते.