Ajit Pawar : सत्तेत आल्यावर काय झालं? इंधन दर कपातीवरुन अजित पवारांची राज्य सरकारवर टीका

राज्य सरकारने (Maharashtra Government) आज पेट्रोल-डिझेलच्या (Diesel ) दरात कपात केल्याची मोठी घोषणा केली. 

Updated: Jul 14, 2022, 07:50 PM IST
Ajit Pawar : सत्तेत आल्यावर काय झालं?  इंधन दर कपातीवरुन अजित पवारांची राज्य सरकारवर टीका title=

पुणे : राज्य सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्याची मोठी घोषणा केली. सरकारने हा निर्णय घेत सर्वसामांन्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी इंधन दरकपातीवरुन एकनाथ शिंदे -भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (maharashtra legislative assembly lop ajit pawar critisize to cm eknath shinde and dcm devendra fadnvis over to decresing petrol diesel rate) 

आम्ही सत्तेत असताना यांच्याकडून इंधनावरील टॅक्स हा 50 टक्क्यांनी कमी करण्याची  मागणी केली होती. मात्र आता हे स्वत: सत्तेत आल्यावर टॅक्स का कमी केला नाही, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार काय म्हणाले? 

"मी सरकारमध्ये असताना पेट्रोल डीझेलवरील टॅक्स सुमारे 10 टक्क्यांनी कमी केला होता. त्यावेळी विरोधीपक्षाने हा टॅक्स 50 टक्क्यांनी कमी करा, अशी मागणी केली होती. मग आज ते सत्तेत आले. तेव्हा का नाही 50 टक्क्यांनी कमी केला, तसं केलं असतं तर पेट्रोल 17 रुपयांनी कमी झालं असतं, अशा शब्दात अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पेट्रोल-डीझेल किती रुपयांनी कमी?

दरम्यान पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल - डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.