Maharashtra Nivadnuk Nikal 2024: 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांतच स्पष्ट होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मोतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत होती. 11 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपच्या परंपरागत मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कांटे की टक्कर दिल्याचे पाहायला मिळतेय.
महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरच्या राजकारणाचा मोठा फटका महायुतीला बसला आहे. महाराष्ट्रात शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहे. तर, त्यातुलनेने अजित पवार गट मात्र पिछाडीवर आहे. त्याचबरोबर, शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूतीचा फायदा होऊ शकते, असं चित्र आहे. उद्धव ठाकरे गटाचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, शिंदे गटाचे 7 उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
अमरावतीत नवनीत राणा 3300 मतांनी पिछाडीवर आहे. तर, बारामतीत मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. साताऱ्यात सातव्या फेरीत शशिकांत शिंदे 13542 मतांनी आघाडीवर आहेत. तर, उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत.
राज्यात महायुतीला फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि बंडखोरी यामुळं महाविकास आघाडीला सहानुभूती मिळाल्याचे चित्र आहे. ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सहानुभूतीचा फायदा झाल्याचा तर्क वर्तवला जात आहे. ठाकरे- शरद पवारांच्या सहानुभीतीचा काँग्रेसला फायदा झाल्याचे चित्र आहे. मराठा, मुस्लिम आणि काही प्रमाणात दलित मते महाविकास आघाडीच्या बाजुने झुकल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.