Maharashtra News : केवळ 5 रुपयांसाठी साताऱ्यातील 40 महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना बदडलं, त्यानंतर...

 Sindhudurg : सातारा येथील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्गात दादागिरी केल्याची घटना घडली आहे. 5 रुपये कर भरण्यावरुन या महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.  

Updated: Jan 21, 2023, 11:47 AM IST
Maharashtra News : केवळ 5 रुपयांसाठी साताऱ्यातील 40 महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना बदडलं, त्यानंतर... title=
40 women tourists beaten Two female employees at Sindhudurg fort

 Sindhudurg News : उमेश परब, झी 24 तास : किल्ले सिंधुदुर्ग (Sindhudurg fort) इथं महिला पर्यटकांची दादागिरी पाहायला मिळाली. 5 रुपये कर भरणार नाही, असे सांगत 40 महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. (Maharashtra News) यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली. त्यानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. स्थानिक महिलांनी पर्यटनाला आलेल्या महिलांना चांगलाच चोप दिला. वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या विषयावरुन हा वाद भडकला आणि महिला एकमेकींना भिडल्यात. कर भरणार नाही असं सांगत या महिलांनी दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत आणि मारहाण केली. (Maharashtra News in Marathi)   

सातारा येथील महिला पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्या आहेत. यानिमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यासाठी गेल्यात. यावेळी वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर घेण्याच्या विषय निघाला. आम्ही हा कर भरणार नाही, असे सांगत दादागिरी केली. त्यावेळी काही महिलांनी हुज्जत घातली. हा वाद टोकाला पोहोचला. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

साताऱ्याच्या महिलांनी स्थानिक कर्मचारी महिलांना मारहाण केल्याची बातमी समजताच या महिला समर्थकांनी किल्ल्यावर धाव घेतली आणि साताऱ्यातील पर्यटक महिलांना चांगलाच चोप दिला. अखेर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी साताऱ्यातील महिलांनी मारहाण केलेल्या महिला कर्मचाऱ्यांची माफी मागितली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

मालवण वायरी ग्रामपंचायतीच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर 5 रुपये पर्यटन कर आकारण्यात येतो. त्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी किल्ल्यावर पर्यटन करण्यासाठी आलेल्या महिलांना हा कर भरण्यास सांगण्यात आले. मात्र, हा कर भरणार नाही असे सांगत नकार दिला. त्यांनी जोरदार हुज्जत घातली. त्यानंतर वाद टोकाला पोहोचला आणि मारहाणीची घटना घडली. यावेळी वायरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही बातमी कळताच त्यांनी होडीच्या मदतीने किल्ल्यावर धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक महिलाही गेल्यात. त्यांनी साताऱ्यातील मारहाण करणाऱ्या महिलांचा चांगलाच आपला इंगा दाखवला. मारहाण करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचा पर्यटन कर देण्याच्या विषयावरुन पर्यटक आणि कर वसुली स्टॉलवरील दोन तरुणी यांच्यात वाद झाला. सातारा येथील सुमारे 40 पर्यटकांनी  दोन महिला कर्मचाऱ्यांना किल्ल्यात तसेच मालवण बंदर जेटी येथे मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग हा वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असल्याने किल्ला दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून ग्रामपंचायतीकडून कर वसूल केला जातो. या कर वसुलीचा स्टॉल सिंधुदुर्ग किल्ल्यात असून त्यावर कंत्राटी पद्धतीने दोन महिला कर्मचारी कर वसुलीचे काम करतात. 

आज सातारा येथील पर्यटकांचा ग्रुप किल्ला दर्शनासाठी आला असता स्टॉल वरील महिला कर्मचाऱ्यांनी कर भरण्यास सांगितले. पर्यटकांनी कर भरण्यास नकार दिल्याने यातून बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी त्या पर्यटकांनी दोन्ही कर्मचारी तरुणींना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पर्यटकांमध्ये महिला पर्यटकांचा मोठा समावेश होता. यावेळी त्या तरुणींनी याबाबतची माहिती ग्रामपंचायतीला कळविली. 

यानंतर किल्ल्यावरुन ते पर्यटक आणि तरुणी होडीतून बंदर जेटी येथे परतल्यावर पुन्हा बंदर जेटी येथे यावरुन दोन गटात बाचाबाची झाली. या घटनेनंतर संबंधित दोन्ही गटाने पोलीस स्थानक गाठले या घटनेनंतर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात धाव घेतली यावेळी वायरी सरपंच भगवान लुडबे, ग्रा. प. सदस्य, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते भाई मांजरेकर, मंदार लुडबे, तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विश्वास गावकर, राजा गावकर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.