राज्यात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासांत 258 रूग्णांचा मृत्यू

कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ   

Updated: Apr 12, 2021, 09:35 PM IST
राज्यात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासांत 258 रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 258 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 52 हजार 312 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही.  

तर मुंबईत आज 6 हजार 905 नव्या कोरोना  रूग्णांची नोंद झाली आहे.  धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 43 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.  

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1 हजार 414 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 453 आहे. तर एका दिवसांत 1 हजार 103 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.