close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते. 

Updated: Sep 18, 2019, 02:49 PM IST
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा

बीड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या यात्रा काढून सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पहिल्या ५ उमेदवारांची घोषणा केली आहे. परळीमधून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडित, माजलगावमधून प्रकाश सोळंके आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादीही १२५ जागा लढणार आहे. तर उरलेल्या ३८ जागा या घटकपक्षांना देण्यात येणार आहेत.

एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी भाजप-शिवसेना मात्र किती जागा लढणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण भाजप आणि शिवसेनेचे बडे नेते मात्र युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.