Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे वातावरणात गुलाबी थंडी अनुभवता येतेय. अनेक ठिकाणी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झालीय. राज्यात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथे मंगळवारी रात्रीचा पारा 16.1 अंशांवर पोहोचला होता.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 6, 2024, 08:07 AM IST
Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राज्यातून मॉन्सून पूर्णपणे परतला नाही. परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आजही राज्यात अवकाळी पावसाचा जोर काही ठिकाणी आहे. काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप उकाडा जाणवत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली आहे. मंगळवारी रात्री महाबळेश्वरमधील रात्रीचे तापमान १६.४ अंश होते. 

पाच दिवस तापमानात घट 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य आणि पूर्व भारतात 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेला तापमानात घट होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशही पाहायला मिळणार आहे. 

(हे पण वाचा - AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?)

पावसाचे सावट कायम

 राज्यात थंडीची चाहूल लागली असली तरी पावसाचे सावट कायम राहणार आहे. नोव्हेंबर महिना सुरु असताना देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नुसता पाऊस नाही तर राज्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होत आहे. अशावेळी सामान्यांना वीज पुरवठा पुरेसा होत नाही. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More