Maharashtra Weather News : मुंबईसह कोकणात पावसाच्या जोरदार सरी आता काहीशा विश्रांती घेताना दिसत असून, अधूमधून होणारी पावसाची रिपरिप वगळता पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज आहे. शहरात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यामुळं कमाल आणि किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे.
तिथं कोकणातही पावसानं एक पाऊल मागं घेतल्यामुळं आता पुन्हा एकदा सूर्यकिरणांचे कडवसे वातावरणाचं वेगळं रुप समोर आणत आहेत. विदर्भ मात्र या साऱ्या प्रणालीला अपवाद ठरत आहे. कारण, इथं काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/L5cm5NXIfy
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 13, 2024
मध्य भारतातील कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे गेलं असून, त्यामागोमागच आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राती निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राज्यातून पावसाचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पश्चिम बंगाल आणि त्या क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळू शकते. याशिवाय गुजरातच्या दक्षिणेपासून कर्नाटकापर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं त्याचे कमीजास्त प्रमाणातील परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसू शकतात.