शरद पवार यांना मोठा दे धक्का, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

Maharashtra Wrestling Council dismissed ​: आताची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.  

Updated: Jul 2, 2022, 12:50 PM IST
शरद पवार यांना मोठा दे धक्का, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त title=

पुणे : Maharashtra Wrestling Council dismissed : आताची सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का मानला जात आहे. ही मोठी कारावाई भारतीय कुस्तीगीर महासंघाने केली आहे. राज्यातील मल्लांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

30 जून रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय झाला. येत्या काही दिवसात राज्य कुस्तीगीर परिषदेवर हंगामी समितीची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

 'कुस्तीगीर परिषद बरखास्त होण्यास लांडगे जबाबदार' 

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्तीगीर महासंघाने  घेतला आहे. 30 जून रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य कुस्तीगिर संघटनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसेच राष्ट्रीय महासंघाच्या अनेक प्रस्तवाकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असं सांगत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्याचं कुस्तीगीर महासंघाने म्हटले आहे. 

विशेष म्हणजे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत. दरम्यान या कारवाईला महारष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. बाळासाहेब लांडगे अगदी अध्यक्षांचा सुद्धा आदेश जुमानत नव्हते, असा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे. 

 दरम्यान, या संदर्भात बाळासाहेब लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.