पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?

Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..

सौरभ तळेकर | Updated: Jul 29, 2024, 03:52 PM IST
पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का? title=
Chetan tupe in Sharad Pawar program

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी यांनी नुकताच शरद पवारांची तुतारी हाती घेत अजितदादांना धक्का दिलाय. त्याला एक दिवसही उलटत नाही तोच अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या मंचावर पाहायला मिळाला.. शरद पवारांच्या कार्यक्रमात अजित पवारांचे आमदार चेतन तुपे उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हडपसर मतदारसंघात वानवडीत सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या कार्यक्रमात आमदार तुपे हे शरद पवारांसोबत उपस्थित होते. त्यामुळे चेतन तुपे पवार गटात जाणार का याचीच चर्चा सुरूये. मात्र, हा कार्यक्रम राजकीय नसल्याचं सांगत पवारांबद्दल बोलणं तुपेंनी टाळलंय. 

चेतन तुपे काय म्हणाले?

मुळात हा राजकीय कार्यक्रम नव्हता म्हणून मी उपस्थित होतो.  सातारा जिल्हा मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम होता मला त्यांच्या अध्यक्षांनी निमंत्रित केले होत त्यामुळे उपस्थित होतो. आम्हीही कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पवार साहेब यांच्याशी काही बोलण झालेले नाही. उगाच TRP साठी काही चर्चा नको. मी पुन्हा सांगतो माझी कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, असं चेतन तुपे म्हणाले.

तर तुसरीकडे नाशकातील सुनिल तटकरेंच्या उपस्थितीत अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकमधील अजित पवार गटाचे महत्वाचे नेते आमदार नरहरी झिरवाळ उपस्थित नसल्याचं चर्चांना उधाण आलंय. काहीच दिवसांपूर्वी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ हा शरद पवारांच्या मंचावर उपस्थित होता. त्यामुळे झिरवाळांच्या मनात काय चाललंय याचीही चर्चा सुरू झालीय. मात्र या सगळ्या चर्चा सुनिल तटकरे यांनी फेटाळून लावल्यात.

काही कार्यक्रम सामाजिक असतात , कोणी गेलं म्हणजे विचार बदलले असं नाही. विधान परिषदेच्या वेळी असे सांगण्यात आलं आमचे उमेदवार शंभर टक्के पडणार, ज्यांनी उमेदवार उभे केले त्यांना बाराच्या पुढे जाता आले नाही, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, 2019 मध्ये मविआची झालेली स्थापना आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ सर्वांनी पाहिलीय.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजुनही काही लहानमोठे भुकंप झाले तर आश्चर्य वाटायला नको.