महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

नेहा चौधरी | Updated: May 2, 2023, 06:59 PM IST
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन title=
mahatma gandhi grandson arun manilal gandhi passes away kolhapur news

Arun Gandhi Death : महात्मा गांधी यांचे नातू आणि सुशीला - मणिलाल यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातच अत्यंसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली. 

तुषार गांधी यांची वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर दिली.  

अरुण मणिलाल गांधी यांचा अल्पपरिचय 

अरुण मणिलाल गांधी यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये  14 एप्रिल 1934 झाला होता. त्याचे वडील आणि महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल हे इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते. तर त्यांची आई सुशिला या इंडियन ओपिनियन वृत्तपत्रात प्रकाशक होत्या. पुढे अरुण गांधी यांनी आजोबांच्या पावला पाऊल ठेवत समाजिक - राजकीय कार्यकर्ते म्हणून काम सुरु केलं.  अरुण गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केलं होतं.

अरुण गांधी हे पाच वर्षांचे असताना त्यांनी महात्मा गांधी यांना पहिल्यांदा पाहिले. त्यांचासोबत वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात 1946 मध्ये आजोबांसोबत राहिले होते. 

 

arungandhi

अरुण गांधी हे 1987 मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. इथे त्यांनी  ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली होती. सामाजिक कार्यासोबत अरुण गांधी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. 

अरुण गांधी यांची पुस्तकं

अरुण गांधी यांनीही लिहिलेल्या पुस्तकांपैकी 'द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी' हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. कस्तुरबा, द फॉरगॉटन वुमन', 'ग्रँडफादर गांधी', 'द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी' ही पुस्तकं लिहिली. 

दरम्यान अरुण गांधी यांच्यावर कोल्हापुरातील वाशीमधील गांधी फौन्डेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.  अरुण गांधी हे कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या हणबरवाडी इथल्या घरी गेल्या दोन महिन्यांपासून राहत होते.  त्यांचा पश्चात मुलगा तुषार, मुलगी अर्चना, चार नातवंडे आणि पाच पणतू असं मोठं कुटुंब आहे. अरुण गांधी यांना शांततेचे पुजारी म्हणून ओळखलं जातं होतं. आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी शांतता आणि सद्भावना या गांधीवादी मूल्यांचा कायम प्रचार केला.