महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु आहे. अशावेळी प्रचाराला जोर आला असून प्रत्येक पक्षाकडून आपापला जाहीरनामा सादर केला जात आहे. आज महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. राज्यात 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या अनुशंगाने हा जाहीरनामा सादर केला गेला. सकाळी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित झाला. त्या पाठोपाठ महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याला 'महाराष्ट्रनामा' असं नाव देण्यात आलं आहे.
मुंबईत मविआतील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या खासदरा सुप्रिया सुळे, संजय राऊत यावेळे उपस्थित होते.
मल्लिकार्जुन खरगे यांनी पहिल्या 100 दिवसांचा अजेंडा या जाहीरनाम्यातून मांडला. यामध्ये महिलांना विशेष गोष्टी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे, महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवसांची ऐश्चिक रजा मिळणार आहे. अनेक खासगी कंपन्यांमध्ये अशापद्धतीची सुट्टी देण्यात येते. पण मविआने या ऐश्चिक रजेबाबत जाहीर केले आहे.
LIVE: Unveiling of Maha Vikas Aghadi (MVA) Manifesto
Mumbai, Maharashtra
— Mallikarjun Kharge (@kharge) November 10, 2024