शिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी

आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

Updated: Jul 9, 2017, 08:02 AM IST
शिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी title=

शिर्डी : आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे लाखो भक्त गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन साईंच्या समाधीचे दर्शन घेतात.. आज पहाटेपासून गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी साडेचार वाजल्यापासून साईंच्या दर्शनाला भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालीय.

शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात झालीय.....साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात.. सबका मालिक एक असा संदेश देणा-या साईबाबांना आपला गुरू मानत असंख्य भाविक साईचरणी आपली भक्ती प्रकट करतात..यात कोळी महिलांचा समावेश देखील आहे, साई बाबाच्या या भक्तांनी आपल्या खास कोळी गीतांच्या स्टाईलमध्ये बाबांचे गीत सादर करून आपली श्रद्धा सुमने अर्पण केली.