Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी 30 दिवसांची मुदत द्या, आंदोलन जास्त ताणू नका, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांना केली. एका दिवसात जीआर काढणं शक्य नसल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले. दरम्यान एका महिन्याचा अवधी कशासाठी असा प्रश्न जरांगे यांनी विचारला.
दरम्यान जीआर काढण्यावर मनोज जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे. शिष्टमंडळ जरांगे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याबाबत राज्य सरकार मागणार जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांचा वेळ मागितलाय सरकारकडून एका दिवसांत जीआर काढणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं 30 दिवसांचा वेळ मागितलाय सरकारच्या वतीनं अर्जुन खोतकरांनी जरांगेपाटलांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरकारकडून 30 दिवसांची मुदत मागितलीय. आता जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आपण त्यांना तीन ते चार दिवसांचा वेळ दिला आहे. अध्यादेश न निघाल्यास पाणी देखील त्यागणार आहे, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. आम्हाला जरांगेंच्या तब्येतीची काळजी आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलो आहोत. आपल्याला शेवट गोड करायचा आहे. शिंदे-फडणवीस- पवार यांच्याशी मी बोलतो. आपण हे उपोषण सोडून मुंबईला यावे, असे आवाहन महाजन यांनी केले.
हे सरकार धाडसी आहे.जे निर्णय होत नव्हते.ते निर्णय या सरकारने घेऊन दाखवले आहे त्यामुळे जीआरची याच सरकारकडून अपेक्षा आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.पण जीआर घेतल्याशिवाय माघार नाही असंही ते म्हणाले.
मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आणखी जास्तीत जास्त 4 दिवसांची मुदत देतो, असे ते म्हणाले.
दुसरीकडे सरकारकडून दोन समाजात भांडणं लावायचं काम सुरु आहे, मराठा-ओबीसीत भांडणं लावायचं काम करु नये असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.. ओबीसी आरक्षण वाढवून द्या आणि त्यात मराठा समाजाचा समावेश करा अशी आपली भूमिका आहे. याबाबत भुजबळांशीही बोलणं झालंय, असंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.
सरकारने गुडघे टेकलेत- राऊत
सरकारने आंदोलकांसमोर गुडघे टेकलेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. सरकारच्या पन्नास खोक्यांनी जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलक विकले जाणार नाहीत असं राऊत म्हणाले.