आलं औषध! एका दिवसात कोरोना खल्लास, पाहा कसं ते...

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे.  

Updated: Jun 14, 2021, 08:13 PM IST
आलं औषध! एका दिवसात कोरोना खल्लास, पाहा कसं ते... title=
संग्रहित छाया

अहमद शेखसह विशाल करोळे / सोलापूर, औरंगाबाद : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल (Monoclonal) अँटिबॉडी कॉकटेलचे (Antibody Cocktail) सकारात्मक परिणाम दिसून येतायेत. अँटिबॉडी कॉकटेल असलेल्या इंजेक्शनच्या वापरामुळे 24 तासांत कोरोनाची लक्षणे गायब झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोरोनाने  (Coronavirus) सारे जग हैराण झाले आहे. कोरोनावर काही औषधं प्रभावी ठरत असल्याचा दावाही केला जातोय. त्यापैकीच अँटिबॉडी कॉकटेलने (Antibody Cocktail) सर्वांचं लक्ष वेधले आहे. या औषधाचा डोस घेताच पहिल्याच दिवशी कोरोना  (Coronavirus) बाधितांमधली लक्षणं गायब झाल्याचा दावा करण्यात येतोय. हैदराबादमधल्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो-एंट्रॉलॉजीनं 40 रूग्णांवर या औषधाचा प्रयोग केला, आणि तो यशस्वी ठरलाय. भारतात या औषधाची किंमत 70 हजार रूपये इतकी आहे. 

मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस घेतल्यानंतर 24 तासांत 40हून अधिक कोरोनाबाधितांचा ताप, अस्वस्थता, खोकला यासारखी लक्षणं गायब झाली. हे औषध ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशातील कोरोना विषाणूच्या व्हिरिएंटविरोधात उत्तमरीत्या प्रभावी ठरले आहे. आता भारतातल्या डेल्टा व्हेरियंटवरही या औषधाचा प्रभाव दिसून येत आहे.

विशेष म्हणजे सोलापुरातल्या बार्शीतही डॉ. संजय अंधारे (Dr. Sanjay Andhare) यांनीही काही रूग्णांवर मोनोक्लोनल अँटीबॉडिजचा (Monoclonal Antibody Cocktail) प्रयोग केला आणि कोविड रूग्ण खडखडीत बरे झाले. कोरोनावर मोनोक्लोनल अँटिबॉडी संजीवनीप्रमाणे काम करत असल्याचं दिसतंय. पण त्याचे दर सामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कमी किंमतीत हे औषध लोकांपर्यंत पोहचावं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.