दोस्त दोस्त ना रहा... सदाभाऊंची जीभ घसरली, राजू शेट्टींचंही शेलक्या शब्दात प्रत्युत्तर

दूध आंदोलनानिमित्त सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे एकेकाळचे सच्चे दोस्त आमने-सामने आले आहेत.

Updated: Aug 1, 2020, 06:51 PM IST
दोस्त दोस्त ना रहा... सदाभाऊंची जीभ घसरली, राजू शेट्टींचंही शेलक्या शब्दात प्रत्युत्तर

सांगली : दूध आंदोलनानिमित्त सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे एकेकाळचे सच्चे दोस्त आमने-सामने आले आहेत. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. 'राजू शेट्टी भंपक माणूस आहे, भ्रमिष्ट झाले आहेत,'अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तर आंदोलन फसल्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखे वागत असल्याचं प्रत्युत्तर राजू शेट्टींनी दिलं आहे. 

बारामतीला राजू शेट्टी पाय चाटायला गेले होते. गावात सोडलेल्या वळू प्रमाणे राजू शेट्टी हा वळू रेडा आहे, असे उद्गार सदाभाऊ खोत यांनी काढले. सरकारने अनेक ठिकाणी दूध आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खोत यांनी केला आहे. तर खोत हे नैराश्येतून भ्रमिष्टासारखे आरोप करत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.