'एमआयएम'ची तिरंगा रॅली : परवानगी नाकारली, इम्तियाज जलील यांचा सरकारवर हा आरोप

MIM Rally in Mumbai :मुस्लिम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी एमआयएमच्यावतीने आज तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. मात्र, या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.  

Updated: Dec 11, 2021, 09:09 AM IST
 'एमआयएम'ची तिरंगा रॅली : परवानगी नाकारली, इम्तियाज जलील यांचा सरकारवर हा आरोप title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : MIM Rally in Mumbai :मुस्लिम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे यासाठी एमआयएमच्यावतीने आज तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. मात्र, या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. औरंगाबादहून 320 गाड्यांची रॅली मुंबईला रवाना झाल्या आहेत. आम्ही ही रॅली काढणार, असा निर्धार खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. रॅली, सभा होणारच असे त्यांनी म्हटले आहे.

एमआयएमच्या आजच्या तिरंगा रॅलीला मुंबईत परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, रॅली, सभा होणारच. 'सरकार रॅली दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप जलील यांनी केला आहे. राज्यातील सर्व विभागातून तिरंगा रॅली मुंबईला निघालेत. औरंगाबाद शहरातून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 320 गाड्यांची रॅली तिरंगा ध्वज लावून  मुंबईकडे रवाना झालेत. 

या सर्व चार चाकी गाड्यांवर तिरंगा ध्वज लावण्यात आलेत. मुंबईत रॅलीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने आमची रॅली दडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र रॅली होणार आणि संध्याकाळी सभा सुद्धा घेणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. सरकार रॅली दडपण्याचा प्रयत्न करतंय मात्र आम्ही ही रॅली करणारच असे राज्यातील एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तिजाय जलील यांनी म्हटले आहे.