मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका मिनी बसचा अपघात झाला आहे.  

Updated: Oct 28, 2017, 09:24 AM IST
 मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात  title=

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका मिनी बसचा अपघात झाला आहे.  

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला झालेल्या या अपघातामध्ये  सोळा जण जखमी झालेत.

उर्से टोलनाक्याजवळ ओझर्डे या गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमींपैकी आठ जण हे गंभीर तर आठ जण किरकोळ जखमी आहेत.

तुषार टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीची मिनी बस क्र. (MH 04 GP 1690) ही मिनी बस ठाण्याहून जेजुरीला जात होती.  दरम्यान ओझर्डे गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक महामार्ग पोलीस व खासगी रुग्णवाहिकांमधून जखमींना रुग्णालयात उपचार करिता पाठविण्यात आले.