माझ्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले: महादेव जानकर

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभेवर केवळ एक आमदार निवडून आला आहे. 

Updated: Aug 25, 2018, 01:46 PM IST
माझ्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले: महादेव जानकर

नाशिक: दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात चांगलीच मुफ्ताफळं उधळली. आपण ब्रह्मचारी आहोत आपण दिलेल्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार गेल्याचं अजब वक्तव्य जानकरांनी केलं. पक्षाची नाशिक जिलह्यातली दयनीय अवस्था पाहून भलतेच नाराज झाले आहेत.

कोंबडी, मासे आणि म्हैस फुकट मिळणार नाही

आपल्या पक्षाची मजबूत बांधणी व्हावी यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करणार नाही. एवढंच नव्हे तर कोणत्याही कार्यकर्त्याला कोंबडी, मासे आणि म्हैस फुकट मिळणार नाहीत. त्यासाठी लायकीचा कार्यकर्ता बना असा सज्जड दमही त्यांनी भरला.  राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्यात बैठका सुरु केल्या आहेत.

विधानसभेमध्ये केवळ एक आमदार

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा विधानसभेवर केवळ एक आमदार निवडून आला आहे.