MLA Jaykumar Gore car accident : साताऱ्यातील (Satara) माण मतदारसंघातील भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे पहाटे त्यांच्या गाडीचा (jaykumar gore accident) अपघात झाला. त्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात (Ruby hospital) दाखल करण्यात आलंय. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे. (MLA Jaykumar Gore car accident father bhagwan gore doubts of assassination marathi news)
अपघाताची माहिती मिळताच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी स्वतः रुबी रुग्णालयात जाऊन आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माध्यमांना विस्तृत माहिती दिली आहे. आमदार जयकुमार गोरे रात्री पुण्याहून फलटणला (Faltan) निघाले. फलटणजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर त्यांची गाडी 60 फूट खाली पडली, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे (Bhagwan Gore) यांना अपघाताविषयी शंका व्यक्त केली आहे. मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे, असं म्हणताच गोरे यांच्या वडिलांना भरून आलं. मात्र एक शंका मनात उत्पन्न होतेय, रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात (Accident) कसा घडतो ? ते देखील फलटणमध्येच हा अपघात घडतो यामुळे आणखीनच शंका येते, असं भगवान गोरे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला मोठा अपघात
दरम्यान, आमदारांच्या वडिलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आमदारसाहेब बरे आहेत, त्यांच्या पाय आणि बरगडीला थोडंसं फ्रॅक्चर (Fracture) आहे, अशी माहिती आमदार गोरेंच्या पत्नी सोनिया गोरे (Sonia Gore) यांनी दिली. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचं टेन्शन कमी झालंय.