'शिवसेना-भाजप युती म्हणजे सत्तेसाठी नंगानाच' - आमदार नितेश राणे

 युती कशासाठी झाली याचा खरा चेहरा आता समोर येतोय असेही ते म्हणाले. 

Updated: Feb 21, 2019, 04:13 PM IST
'शिवसेना-भाजप युती म्हणजे सत्तेसाठी नंगानाच' - आमदार नितेश राणे  title=

मुंबई : शिवसेना-भाजपा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती करणार असल्याची घोषणा केली आहे. एकमेकांवर सातत्याने टीका करणारे दोन पक्ष निवडणूकीसाठी एकत्र आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या युतीवर टीकेची झोड उडवली आहे. यामध्ये आता आमदार नितेश राणे यांनी युतीवर  निशाणा साधला आहे.  'शिवसेना-भाजप युती म्हणजे सत्तेसाठी नंगानाच' असल्याचा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री कोणाचा यासाठी जर एकमेकांचे कपडे फडात असतील तर यांना खरच महाराष्ट्र जनतेचं काय पडलं आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. युती कशासाठी झाली याचा खरा चेहरा आता समोर येतोय असेही ते म्हणाले. 

Image result for nitesh rane zee news

युतीची घोषणा करताना नाणार प्रकल्पाचा मुद्दाही काढण्यात आला. स्थानिकांना त्रास होत असेल तर प्रकल्प हलविण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तर नितेश राणे यांनी जैतापूर मुद्द्याला यावेळी हात घातला. आधी जैतापूरचा अद्यादेश रद्द करून दाखवा मग नाणार बद्दल पेढे वाटावेत असे राणेंनी म्हटले आहे.  जे जैतापूर रद्द करू शकले नाहीत ते नाणार काय रद्द करणार ? असा खरमरीत प्रश्न करत त्यांनी टीकेची झोड उडवली आहे. नाणार फक्त 6 महिन्यासाठी बाजूला ठेवले आहे, निवडणुका झाल्यानंतर पुन्हा हा प्रकल्प  माथी मारणार हे लोकांनी समजावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. सत्तेमध्ये असताना जैतापूर रद्द करून शिवसेनेने दाखवला का? मग खासदार यांनी वाटलेले पेढे हे जैतापूरसाठी होते की नाणारसाठी होते याचा खुलासा विनायक राऊत यांनी करावा असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.