मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत.
येत्या १३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीतील नाणारला भेट देणार आहेत. इथे ते स्थनिक ग्रामस्थाशी संवाद साधणार आहेत. नाणार ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांची मते राज ठाकरे जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रकल्पाबाबत ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे.
या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.