सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांची भेट घेतली. भारती हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये, ठाकरे आणि कदम यांच्यात तब्बल अर्धातास चर्चा झाली. ही औपचारिक भेट असल्याची प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली असली तरी, ह्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांच्याशी अनेक वर्षांपासून स्नेह संबंध आहेत, शिवाय भारती हौस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पाहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्यानुसार राज ठाकरे यांची भेट झाली असल्याची प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली आहे
दरम्यान राज ठाकरे यांनी त्यानंतर माजी मुख्यमंत्री स्वर्गिय वसंतदादा पाटील यांच्या समाधीच दर्शन घेतलं. यावेळी काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील आणि विशाल पाटील हे उपस्थित होते.एकीकडे राज्यात राजकीय आणि सामाजिक घडामोडी वेगाने घडत असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगलीत येऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
तरी ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगितले.