राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना गाडीला अपघात, पदाधिकाऱ्याचा मृत्यू

MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई, दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एका मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Updated: May 7, 2023, 07:37 AM IST
राज ठाकरे यांच्या सभेला जात असताना गाडीला अपघात, पदाधिकाऱ्याचा मृत्यू title=

MNS worker Car Accident in Sangameshwar : मुंबई, दहिसरहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळ रात्री हा अपघात झाला. या अपघातात एका मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मनसे उपशाखाध्यक्ष देवेंद्र जगन्नाथ साळवी यांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत संध्याकाली सभा होणार आहे. यासाठी मनसे दहिसर शाखा पदाधिकारी आपल्या कारने रत्नागिरीला आदल्या दिवशी निघाले होते. त्यांच्या गाडीला संगमेश्वर येथे अपघात झाला. तुरळ येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. देवेंद्र जगन्नाथ साळवी राहणार मालगुंड सध्या बोरीवलीत राहत होते. या अपघाताची माहिती मिळताच मनसेचे बाळा नांदगावकर, मनसे उपनेते संदीप देशपांडे, मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र चव्हाण, नंदू फडकले आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. संदीप देशपांडे यांनी सांगितले की, एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. बाकींची प्रकृती स्थिर आहे. 

बारसू रिफायनरीबाबत राज कोणती भूमिका घेणार?

राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होत आहे आहे. रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. कोकणातील या सभेला किती प्रतिसाद मिळतो, याचीही उत्सुकता आहे. या सभेत राजकीय तोफा धडाडणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनीही कोकणातील सभेत अनेकांचा समाचार घेणार असल्याचे म्ह्टले आहे.

दरम्यान, राजापूर येथील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध वाढत आहे. तर राज्य सरकार आणि भाजपने प्रकल्पाच्या बाजुने निर्णय घेतला असून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी राज ठाकरे यांनी कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प नको अशी भूमिका घेतली होती. आता  राज ठाकरे आज बारसूवर भूमिका मांडणार का?  याकडे लक्ष लागले आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? हे पाहणं महत्वाचे आहे. “सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करु. असे टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या आवाजात म्हटले आहे.

दुसरीकडे उध्दव ठाकरे बारसू येथे प्रकल्प बधितांची भेट घेतली आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने प्रकल्प विरोधकांमध्ये असंतोष आहे.  त्यामुळे रिफायनरी विरोधक आणि समर्थक असा शक्ती प्रदर्शनाचा कलगीतुरा राजापूरमध्ये आज पाहायला मिळाला आहे. यावर राज भाष्य करणार का, याकडे लक्ष आहे.