Maharashtra Weather News : मान्सून 4 जूनला गोव्यात धडकलं असून महाराष्ट्रातील आगमनासाठी काही तास उरली आहेत. मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यातही वरुणराजा येण्याचा अंदाज आहे. तर विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मान्सूनची प्रगतीचे संकेत 10 जूनपर्यंत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलंय. तर आज विदर्भासह संपूर्ण नागपुरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गुरुवार ते रविवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. यावेळी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. यासोबतच राज्याच्या इतर भागातही चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलंय.
मान्सून दाखल होण्यापूर्वीच मान्सूनपूर्वी पावसाने पुणे, सांगली, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत थैमान घातल्याचा पाहिला मिळाला. पुण्यात जणू ढगफुटी झाली असंच काहीस चित्र होतं. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया जिल्ह्यातही वरुणराजा बरसला.
कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येलो अलर्ट जरी करण्यात आलाय.