राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला

या दिवशी सुरू होणार अधिवेशन 

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला title=

नागपूर : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आदेश जारी केलेत. ४ जुलैपासून हे अधिवेशन सुरु होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. मात्र शिवसेनेसोबत बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्याभरापासून ही चर्चाच होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा न करताच अधिवेशन नागपूरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.