अहमदनगर : मार्च महिना आला की अहमदनगरकरांच्या सक्कर चौकातल्या चकारा वाढतात.
त्यामागचं कारणही तसचं आहे..आबाल वृद्धांचं आवडतं पेय याच चौकात मिळते. नगर-पुणे रस्त्यावर सक्कर चौकात वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या या बेलेश्वर पौष्टिक ताक व उडपी सेंटरच्या गाडीवर पूर्वी उडपी पदार्थ मिळायचे. पण आता फक्त ताक विक्रीच होते . खारे , मसाला , आणि गोड ताक अशा तीन प्रकारात ताक उपलब्ध आहे.
उन्हाळा आला की घशाला पडलेली कोरड संपविण्यासाठी आपण नेहमीच थंड पेयांचा आधार घेतो . पण कार्बोहायड्रएडचा मारा करणारी थंड पेय आपल्याला घातक ठरतात. नगरमध्ये उन्हाळा आला की असा ताक विक्रेत्यांची संख्या वाढते आणि ताक शौकिनांचीदेखील ...खवय्ये नगरकर उन्हाळ्यात हे असे पौष्टीक ताक पिणेच पसंत करतात . रणरणत्या उन्हात थंडगार शीतपेयाऐवजी ताक पिले की मन शांत होतं. नगर जिल्ह्यात दुध उत्पादन विक्रमी होते . त्यामुळे इकडे दुघ्ध जन्य पदार्थांची रेलचेल असते .
नगर पुणे रस्त्यावर वरून जाणारे वाहनचालक प्रवासी आठवणीने आवर्जून या ठिकाणी थांबतात आणि रणरणत्या उन्हात ताक पिण्याचा आनद लुटतात . आरोग्यासाठी ताक अत्यंत फायदेशीर आहे. नगर पुणे रस्त्यावर थाटण्यात आलेल्या या ताक विक्रीच्या गाड्या वर्षाच्या बाराही महिने सुरु असतात. एका गाडीवर सकाळी ७ ते सायंकाळी चार या वेळेत एका दिवसात तब्बल ६०० लिटर ताकाची विक्री होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळात नगर-पुणे रस्त्यावरून प्रवास केलात, तर ताकाचा आस्वाद घ्यायला विसरू नका