खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सिंदखेडराजाच्या विकासासाठी जाहीर केलेला निधी कोठे आहे, असा सवाल उपस्थित केला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 12, 2018, 08:31 PM IST
खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा title=

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सिंदखेडराजाच्या विकासासाठी जाहीर केलेला निधी कोठे आहे, असा सवाल उपस्थित केला. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.

सिंदखेडराजाच्या विकासाचे काय?

सिंदखेडराजाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी ३११ कोटी रुपयांचा निधी  जाहीर केला होता. मात्र, अजूनही हा निधी उपलब्ध करून दिलेला नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दमम्यान, आजपासून महिन्याभराच्या आत हा निधी उपलब्ध करून दिला नाही तर मी येत्या १२ फेब्रुवारीला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत आंदोलन करणार. सिंदखेडराजाला येथे  उपविभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करणार आहे, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली.

मला अजून ऊर्जा मिळते

'तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ,जय शिवराय' ही साद घालत राज्यभरातून राजमाता जिजाऊंना प्रेरणास्थान मानणारे लाखो नागरिक जिजाऊंच्या चरणी अभिवादन करायला येत असतात.या नागरिकांसोबत यानिमित्ताने संवाद साधता येतो,हाच संवाद व जिजाऊंचे अभिवादन मला दरवर्षी काम करायला अजून ऊर्जा देणारे ठरते.

केजरीवाल यांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राज्यात कोरेगाव भीमा दंगल घडविण्यात भाजप सरकारचा हात असल्याचा आरोप केजरीवल यांनी केला. राज्यात शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय. यांना शाळाही चालवता येत नाही तर हे सरकार काय चालवणार, अशी जहरी टीका केजरीवाल यांनी केली.