हिंमत असेल तर.... उदयनराजे भोसले यांचं अजित पवार यांना खुलं आव्हान

अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर उदयनराजे भोसले यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

Updated: Jun 17, 2022, 05:49 PM IST
हिंमत असेल तर.... उदयनराजे भोसले यांचं अजित पवार यांना खुलं आव्हान  title=

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टीकेला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. यावेळी उदयनराजे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. (MP Udyanraje Bhosle Open challenge to Ajit Pawar)

'हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा. कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. 

साताऱ्यातील एमआयडीसीचा विकास हा टक्केवारीच्या नेत्यांमुळे रखडला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर उत्तर देताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.

'मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल समोरासमोर यावं. सगळे मिळून ईडी चौकशीला सामोरे जाऊ. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा.' असं आव्हान देखील उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे.