मुंबई : कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उद्या निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी जवळपास 70 हजार इतकी मतदार नोंदणी झाली आहे. चौरंगी लढाई होत असली तरी थेट लढत ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी- शेकाप पुरस्कृत पुरोगामी आघाडी तसंच मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यावेळी रिंगणात आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठीही उद्या निवडणूक होते आहे. या निवडणूकीसाठीही सर्वांनीच आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
कोकण जिल्ह्यात एकूण ५४ मतदार केंद्रे आहेत. तसेच या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून सुमारे दोन हजाराहून अधिक पोलीसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. या निवडणूकीत भाजपकडून निरजंन डावखरे, शिवसेनेकडून संजय मोरे तर राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.