आपत्ती व्यवस्थापनविषयी हायकोर्ट राज्य सरकारवर नाराज

 आपत्ती व्यवस्थापनाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. 

Updated: Sep 21, 2018, 11:11 AM IST
आपत्ती व्यवस्थापनविषयी हायकोर्ट राज्य सरकारवर नाराज  title=

मुंबई : आपत्ती व्यवस्थापनाविषयी राज्य सरकारनं दाखवलेल्या अनास्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यात काही जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट आहे. असं असून देखील आपत्ती व्यवस्थापनाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. 

राज्य सरकार अपयशी  

दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थितीवर सरकारने गांभीर्यानं उपाययोजना करण्यचे निर्देशही उच्च न्यायालयानं दिलेत. याआधीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या स्थापनेविषयी न्यायालयानं निर्देश दिले आहेत.

पण राज्य सरकार अशी यंत्रणा स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केलीय. शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्नही न्यायालयानं सरकारला विचारलाय.

यंत्रणेसाठी निधीच नाही 

अर्थसंकल्पात आपत्कालीन यंत्रणेसाठी निधीची होत नाही. जोवर निधी विभागाच्या खात्यात येत नाही, तोवर खर्च होणार नाहीत. आपत्ती व्यवस्थापनासाठी दोन विशेष बँक खाती उघडवी लागतात. या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत किती निधी जमा झाला, याचा तपशीलही उच्च न्यायालायनं पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.