युवकाची आणि दुकान मालकाची हत्या, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर शहरात  एका २३ वर्षीय युवकाच्या हत्येने खळबळ 

Updated: Oct 26, 2019, 09:40 PM IST
युवकाची आणि दुकान मालकाची हत्या, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न title=
संग्रहित छाया

चंद्रपूर : शहरात घुटकाळा- नेहरू शाळा चौक या अत्यंत गजबजलेल्या परिसरात एका २३ वर्षीय युवकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. राजन व साजन डोंगरे या बंधुसह आणखी दोन आरोपी तिथे आले. त्यांच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्रांनी अक्षयवर सपासप वार केले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही हत्या कार करण्यात आली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

सराफा व्यापार कडकडीत बंद 

नांदेड शहरातील सराफा बाजारातील दुकानात शिरून दुकान मालकाची हत्या करण्यात आली आहे. रवींद्र चक्रवार असे या व्यक्तीचे नाव आहे. धारदार शस्त्राने वार करत व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर दुकानातील दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीर चोरला. या निषेधार्थ शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.

तरुणीला रुग्णालयात हलविले

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर इथल्या वालिवली गावात तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर तरुणीला नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.