ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांची महारॅली

 पुण्यातील जामा मस्जिद इथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप आझम कॅम्पस इथे करण्यात आला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 10, 2018, 10:50 PM IST
ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांची महारॅली title=

पुणे : तोंडी ट्रिपल तलाकवर बंदी घालणाऱ्या कायद्याविरोधात पुण्यातल्या मुस्लिम महिलांनी महारॅली काढली. पुण्यातील जामा मस्जिद इथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप आझम कॅम्पस इथे करण्यात आला. 

विविध मुस्लिम संघटनांच्या वतीनं आयोजित रॅली

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनललॉ बोर्ड आणि पुण्यातील विविध मुस्लिम संघटनांच्या वतीनं आयोजित, या रॅलीमध्ये हजारो मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला. 

ट्रिपल तलाक विरोधात आणि शरियतचं समर्थन

दरम्यान ट्रिपल तलाक विरोधात आणि शरियतचं समर्थन करण्यासाठी काढण्यात आलेल्या, या रॅलीतील संयोजक महिला वगळता इतर महिलांना मात्र, पत्रकारांशी बोलायला मज्जाव करण्यात आला होता.