थर्टी फस्टलाच कोल्हापुरात मटणाचा प्रश्न पेटला

तांबडा, पांढरा रस्सा होणार गायब 

Updated: Dec 31, 2019, 04:16 PM IST
थर्टी फस्टलाच कोल्हापुरात मटणाचा प्रश्न पेटला  title=

कोल्हापूर :  ऐन ३१ डिसेंबरला कोल्हापुरात मटणाचा प्रश्न पेटला आहे. अन्न औषध आणि महानगरपालिकेकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत मटण विक्रेत्यांनी मटण विक्री थांबवली आहे. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला असून विक्री थांबवण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे कोल्हापूरकरांच्या न्यू सेलिब्रेशनच्या आनंदावर विरजण पडतंय. आजचा दिवस नियम बाजूला ठेवा अशा प्रतिक्रिया ग्राहकांमधून येत आहेत.  

घरी मटण अस्वच्छ आणि शिळं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानंतर कोल्हापुरात एफडीएने मटणाच्या दुकानावर छापा देखील टाकला. यामध्ये राजू मटण शॉप हे दुकान बंद करण्यात आलं होतं. कोल्हापुरात पहिल्यांदाच एफडीएने दुकानावर कारवाई केली होती. कोल्हापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने मटणाच्या दुकानावर छापा टाकला आहे. राजू मटण शॉप असं या दुकानाचं नाव आहे. या मटणाच्या दुकानात स्वच्छतेसंदर्भातले निकष पाळले गेले नाहीत असा एफडीएचा दावा आहे. शिवाय मटण ज्या पाण्याने धुतलं ते पाणीही योग्य नव्हतं. तसंच मटण कापणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय चाचणी झाली नव्हती असं एफडीएचं म्हणणं आहे.

कधी कधी मटण देताना आदल्या दिवशी शिल्लक राहिलेल्या बकऱ्याचं मटणही ग्राहकाच्या गळ्यात बांधलं जातं. असं मांस खाल्ल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं मटण घेताना काळजी घेण्याचं आवाहान एफडीएनं केलं आहे. या सगळ्याप्रकारावर एफडीएने कारवाई केली. या कारवाईविरोधात मटण विक्रेत्यांनी विक्री थांबवली आहे. 

सगळीकडे थर्टीफस्टचा उत्साह पाहायला मिळत असताना कोल्हापुरकरांच्या आनंदाला गालबोट लागलं आहे. कोल्हापुरात तांबडा, पांढरा रस्सा लोकप्रिय आहे. मात्र मटण विक्रेत्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.