Video: नागपूरमधील अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही चित्रित, पाच जण जखमी

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बेदरकार बोलेरो पिकअपनं रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपुरातील भाजी बाजारात ही धक्कादायक घटना घडली. बेलेरोचा वेग इतका होता की, गाडीनं भाजीचे पाच ठेले धडकेने उडवून दिले. तसेच एका स्कुटीला धक्का मारत सुमारे 200 मीटर दूर फरफटत नेलं.

Updated: Dec 6, 2022, 01:45 PM IST
Video: नागपूरमधील अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही चित्रित, पाच जण जखमी title=

नागपूर, अमर काणे, प्रतिनिधी: नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बेदरकार बोलेरो पिकअपनं रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. नागपुरातील भाजी बाजारात ही धक्कादायक घटना घडली. बेलेरोचा वेग इतका होता की, गाडीनं भाजीचे पाच ठेले धडकेने उडवून दिले. तसेच एका स्कुटीला धक्का मारत सुमारे 200 मीटर दूर फरफटत नेलं. यामुळे या भागात काही काळ भीतीचं वातावरण होतं. या अपघातात (Accident) पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ बोलेरो चालकाला अटक (Bolero Driver Arrest) केली असून चौकशी सुरु केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. व्हिडीओतील दृष्य तुम्हाला विचलित करू शकतात. सदर ड्रायव्हर दारुच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

बातमी वाचा- Chandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला केली आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसात या भागातील अपघाताच्या घटना पाहता उपाययोजना करण्याची मागणी नागरीक करत आहेत.