मुलं-नवऱ्याची इंजेक्शन देऊन हत्या करून महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपूरच्या घटनेत धक्कादायक खुलासा

डॉक्टर महिलेने आपल्या पती आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडली होती. 

Updated: Aug 20, 2020, 07:51 PM IST
मुलं-नवऱ्याची इंजेक्शन देऊन हत्या करून महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपूरच्या घटनेत धक्कादायक खुलासा

अमर काणे, झी मीडिया, मुंबई : डॉक्टर महिलेने आपल्या पती आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडली होती. त्याबाबतचा धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे. डॉक्टर पत्नीने आपल्या नवऱ्याला आणि मुलांना इंजेक्शन देऊन आधी मारलं आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. 

डॉक्टर सुषमा राणे या महिलेने नवरा धीरज, मुलं ध्रुव आणि लावण्या यांची इंजेक्शन देऊन हत्या केली. त्यानंतर सुषमा राणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुषमा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा पोलीस आता शोध घेत आहेत. 

डॉक्टर सुषमा राणे यांनी हे पाऊल का उचललं? याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. सुषमा राणे यांच्या खोलीत जी चिठ्ठी सापडली आहे, त्या चिठ्ठीची सत्यता पोलीस तपासून पाहत आहेत. या चिठ्ठीचं फॉरेन्सिक इनव्हेस्टिगेशन सुरू असल्याचं पोलीस सांगत आहेत.

उच्चशिक्षीत आणि सुखवस्तू कुटुंब कोणत्या तणावात होतं, त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? घातपात असेल, तर त्यामागे कोण आहे? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आता पोलीस शोधू लागले आहेत.