Corona : नागपुरात आजही मोठी वाढ, तब्बल 54 रुग्णांचा मृत्यू

नागपुरात कोरोना झपाट्याने पसरतोय...

Updated: Mar 27, 2021, 06:27 PM IST
Corona : नागपुरात आजही मोठी वाढ, तब्बल 54 रुग्णांचा मृत्यू

नागपूर : नागपुरात कोरोनाचं थैमान काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये. आज शहरात 33 तर ग्रामीणमध्ये 17 आणि जिल्ह्याबाहेरील 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात आज तब्बल 3688 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यापैकी 2595 जण शहरातील तर 1089 जण ग्रामीण भागातील आहेत. तर आज 3227 जण कोरोना मुक्त देखील झाले आहेत.

जिल्ह्यात 37,343 एक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 4877 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मुंबईनंतर आता नागपुरातही कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची गती वाढत आहे. 31 मार्च पर्यंत येथे लॉकडाऊऩ आहे. पण परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की 24.1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोना रूग्णांसाठी बेडची संख्या खूपच कमी आहे.

कोरोना रुग्णांची ही वाढ अशीच सुरु राहिली तर नागपुरात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. नागपूरकर जर वेळीच सावध झाले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.