नागपूर अपहरण आणि हत्या : मुख्य आरोपीची रायपूर येथे आत्महत्या

 व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून एकाला याप्रकरणी अटक केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 1, 2017, 02:56 PM IST
नागपूर अपहरण आणि हत्या : मुख्य आरोपीची रायपूर येथे आत्महत्या title=

नागपूर : येथील व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून एकाला याप्रकरणी अटक केली आहे.

लॉजवर जीवन संपवले

छत्तीसगडमधल्या रायपूर इथल्या एका लॉजमध्ये त्यानं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 

खंडणीसाठी अपहरण

२१ नोव्हेंबरला राहुल आगरेकर यांचं एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन नंतर खून करण्यात आला होता. 

पश्चिम बंगालमधून एकाला अटक

दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोघांनी राहुल आगरेकर यांचं अपहरण करुन खून केला होता. यापैकी पंकज हारोडे  याला नागपूर पोलिसांनी पश्चिम बंगालमधल्या हावडा इथून काल अटक केली होती.