अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या कार्यालयात तोडफोड (Vandalized Amazon Office) केलीय. अॅमेझॉनवरून पाकिस्तानच्या झेंड्याची (Pakistan Flag) ऑनलाईन विक्री होत असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयाला धडक दिली. आक्रमक मनसैनिकांनी कार्यालयातील खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. पाकिस्तानचे झेंडे ऑर्डर करा 24 तासात तुम्हाला घरपोच देऊ अशा पद्धतीने ॲमेझॉन कडून पाकिस्तानचे झेंडे विक्री केल्या जात असल्यामुळे मनसेकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. यासंदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आले होते.
मात्र तरीही ही विक्री थांबवण्यात आली नसल्याने आज संतप्त होत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲमेझॉनचे बैद्यनाथ चौकातील कार्यालयात घुसून तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनच्या बैद्यनात चौकातील कार्यालयात तोडफोड केली.
मुंबई-गोवा माहमार्गाचा प्रश्न
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी खुलं पत्र लिहिलंय. कुठला सैनिक राज्याचं आणि देशाचं नुकसान करतो असा सवाल रवींद्र चव्हाण यांनी केलाय. तसंच हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची प्रतिज्ञाही चव्हाणांनी घेतलीय. तर मनसेनंही रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर दिलंय. दगड नीट रचायला शिका म्हणजे दगड भिरकावण्याची वेळ येणार नाही, असं मनसेनं म्हटलंय.
मनसेचं चव्हाणांना उत्तर
रविंद्र चव्हाण यांच्या पत्राला मनसेनेही उत्तर दिलं आहे. 17 वर्ष झोपले होते का ? आता एक लेन पूर्ण करताय तर लोकांवर उपकार करत नाही. 15 हजार लोकांचे खाल्ले आहे ते महाराष्ट्र प्रेमी की महाराष्ट्र द्रोही ? खड्ड्यात पडून लोकांचा जीव गेला ज्यांच्यामुळे जीव गेला ते महाराष्ट्र प्रेमी की महाराष्ट्र द्रोही ? झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करण्यासाठी त्यांच्या कानाखाली आवाज काढावा लागतो. कारण लातो के भूत बातों से नही मानते. महाराष्ट्र सैनिकांनी केलेल्या आंदोलनाचा आम्हाला अभिमान आहे. पाच वर्षे फडणवीस यांच सरकार होतं मग रस्ता का झाला नाही ? फक्त दौरे करून रस्ता होणार नाही हे चव्हाण यांनी लक्षात घ्यावं. आणि पत्रक बाजी करूनी फायदा नाही रस्ता पहिल्यांदा तयार करा. आणि तयार केल्यानंतर तो खराब होणार नाही याचीही शाश्वती द्या, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.
पदयात्रा काढणार
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे पदयात्रा काढणार आहे. बुधवार म्हणेज 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि शासना समोर मनसे कडून मांडण्यात येणार असल्याची माहिती येणार आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.