नागपूर : जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे जगाची मोठ्या प्रमाणावर जागतिक आणि आर्थिक नुकसान झालं आहे. भारतामध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १००च्या वर गेली आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या कलबुर्गीमधील वृद्ध आणि दिल्लीतील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनाचे थैमान सर्व क्षेत्राला घायकुतीस आणणारे ठरल्याचे चित्र एकीकडे असतानाच संत्रा उत्पादकांची मात्र करोनामुळे ‘दिवाळी’ झाली आहे. संत्र्यांमुळे प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे देशांतर्गत आणि आखाती देशात चढय़ा भावाने संत्र्याचा पुरवठा होत आहे.
व्हिटॅमिन 'सी' युक्त फळे खाण्याचा वैद्यकीय सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे. गेल्या तीन आठवड्यापासून देशांतर्गत बाजारपेठ आणि आखाती देशातल्या बाजारपेठेत संत्र्याची मागणी वाढल्याचा दावा महाऑरेंज संस्थेच्या श्रीधर ठाकरेंनी केला आहे.