पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून व्यापारी महासंघाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारपेठेतली मेडिकल, किराणा जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत.
पुणे | पुण्यातील दुकानं ३ दिवस बंद
व्यापारी महासंघाचा निर्णय
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहणारhttps://t.co/HOK58cBO5u#Pune #coronavirusindia— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 16, 2020
दरम्यान, पुण्यातील कोरोना व्हायरसचा फैलाव हा दुसऱ्या टप्प्यावर आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. पण यात संचार बंदी नसेल अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. तसंच ज्या खासगी कंपन्यांना शक्य आहे त्या कंपन्यांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे, आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसने भारतात प्रवेश केला असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. यापैकी सर्वाधिक १६ रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी महापालिकेची सर्व गार्डन्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना जंतूचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातली २०२ गार्डन्स अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यत पूर्ण वेळ गार्डन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.