कौतुकास्पद! नागपूरच्या पोलीस आयुक्तांची लय भारी कामगिरी, तुम्हालाही वाटेल अभिमान

 चोरीच्या तपासामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: लक्ष घातलं. दोन महिन्यांमध्ये चोरीचा छडा लावत महिलेला घरी जाऊन चोरी झालेला मुद्देमाल दिला. 

Updated: Aug 5, 2022, 10:14 PM IST
कौतुकास्पद! नागपूरच्या पोलीस आयुक्तांची लय भारी कामगिरी, तुम्हालाही वाटेल अभिमान title=

नागपूर : दोन महिन्यांपूर्वी एका वृद्ध महिलेच्या घरी चोरी झाली होती. या चोरीमध्ये त्यांची आयुष्यभराची जमापुंजी चोरट्यांनी चोरली होती. या चोरीच्या तपासामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: लक्ष घातलं. दोन महिन्यांमध्ये चोरीचा छडा लावत महिलेला घरी जाऊन चोरी झालेला मुद्देमाल दिला. 

नेमकं काय आहे प्रकरण?
वृद्ध महिला जानकी खिलवानी 6 जूनला दुपारी बारा वाजता जवळच्या मंदिरात गेल्या होत्या. या काही वेळामध्ये चोरट्यांनी डाव साधला आणि घराचे कुलूप तोडून त्यांची आयुष्यभराची जमापुंजी आणि दागिने चोरून नेले. याबाबत जानकी खिलवानी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये गेल्या.  

लोकांच्या गर्दीत एक वृद्ध महिला उभी राहून काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आलं. आयुक्तांनी खिलवानी यांना बोलावल्यावर त्यांनी घडलेला प्रकार पोलीस आयुक्तांना सांगितला.  

आयुक्तांनी असा लावला चोरीचा शोध- 
वृद्ध महिलेच्या घरी झालेली ही चोरी उघडकीस आणायची, त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळवून द्यायचा असा निर्धारच आयुक्तांनी केला. त्यानंतर पोलिसांची वीस पथक केली. शहरातील शेकडो ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आयुक्तांनीच निर्धार केल्यावर पोलिसांनीही आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. 

दरम्यान, गवतातून सुई शोधल्यासारखी खिलवानी यांच्या घरी चोरी केलेल्या चोरांना शोधून काढलं. तोपर्यंत चोरट्यांनी चोरलेली रोख रक्कम खर्च केली होती तर सोन्याचे दागिने वितळवले होते. पोलिसांनी सोन्याचे दागिने आणि चोरी गेलेल्या रोख रकमेचा धनादेश खिलवानी कुटुंबियांना परत दिला.