आम्ही हायअलर्ट वर, कायदा हातात घेतला तर कठोर उत्तर - नागपूर पोलीस आयुक्त

देशात आणि राज्यात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांना हायअलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

Updated: Apr 18, 2022, 01:55 PM IST
आम्ही हायअलर्ट वर, कायदा हातात घेतला तर कठोर उत्तर - नागपूर पोलीस आयुक्त title=

नागपूर : देशात सध्या अनेक भागात तणावाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांना हायअलर्टवर ठेवण्यात आलं आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा ही दिला आहे. (Nagpur Police on high Alert)

'राज्यात आणि देशात घडत असलेल्या धार्मिक तेढ वाढवणाऱ्या काही घटना पाहता, आम्ही सर्व हाई अलर्ट वर आहोत. नागपूर शहरात पूर्णपणे शांतता आहे. सर्व समाजातील नेत्यांसोबत आम्ही चर्चा करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नागपूर शहरात उपस्थित होऊ देणार नाही.'

'कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना कठोर उत्तर देण्यास आणि कारवाई करण्यास पूर्णपणे तयार आहे. असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

'धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर संदर्भात कायद्यानुसार जे नियम आहेत, शासनाच्या ज्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी नागपुरात शंभर टक्के करण्यात येईल. या मुद्यावर जर कोणी कायदा हातात घेतलं तर कठोर कारवाई केली जाईल.'