अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या पुढे आहे. तर चंद्रपुरात 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. आता या उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. (nagpur regional meteorological department said that vidarbha will be relieved from heat for next three four days)
विदर्भात 2 ते 3 डिग्री तापमान घटण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन-चार दिवसात काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
तसेच विदर्भात मान्सूनबाबत आता सांगता येणार नाही. मात्र यंदा मान्सून सामान्य राहणार आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं.
मान्सून केरळात लवकर पोहचत असल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलं. साधारण 1 जूनला मान्सून केरळात येतो.मात्र यंदा 27 मेला मान्सून पोहचेल. तसेच मुंबईत 10 जूनला मान्सून दाखल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे उन्हामुळे वैतागलेल्या जनतेचं लक्ष हे पावसाकडे लागलंय.