धक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू

पवनी वनपरिक्षेत्रातील पुसादा बिटमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Updated: Nov 18, 2017, 03:45 PM IST
धक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू title=

नागपूर : गेल्या महिन्यात विजेचा शॉक लागून वाघाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा 2 वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आलंय. पवनी वनपरिक्षेत्रातील पुसादा बिटमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

पुन्हा 2 वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर

एक वाघीण आणि एक वाघाचे मृतदेह या परिसरात सापडलेत. शुक्रवारी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यास वाघांचे हे दोन्ही मृतदेह दिसल्यावर त्याने वरिष्ठ वन अधिकाऱ्यास माहिती दिली. 

एक वाघीण आणि एक वाघाचे मृतदेह

या दोन्ही वाघांच्या मृतदेह पासून सुमारे 200 मीटर अंतरावर एका गाईचा देखील मृतदेह वन कर्मचाऱ्यास सापडलाय. सुमारे 2 ते 3 दिवसांपूर्वी या वाघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. 

मृत्यूचे नेमके कारण समोर येईल

विष बाधित झाल्याने वाघांचा मृत्यू झाल्याच्या संशय वन विभागाला आहे. वाघांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.