नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना बाहेरचे लोक आपल्याला काय मदत करणार असे वक्तव्य केले. त्या विधानाचा नाना पटोले ( Nana Patole ) यांनी समाचार घेतला.
अजित पवार कोणत्या उद्देशाने बोलले ते मला माहित नाही. मात्र, त्यांचा स्वतःचा राज्यसभेचा उमेदवार गुजराती आहे. त्यामुळे एकदा त्यांच्या विधानाचा उद्देश कळला की वक्तव्य करता येईल असे नाना पटोले म्हणाले.
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjy Munde ) यांनी एका कार्यक्रमात बोलताना भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनेल असे म्हटले. त्यावर नाना पटोले यांनी स्वप्न बघणे हा सर्वांचा अधिकार आहे. काही लोक दिवसाही स्वप्न बघतात असा खोचक टोला लगावला.
लोकशाहीत मुख्यमंत्री कोण बनेल हे जनता ठरविते असते. त्यामुळे स्वप्न बघणे हा सर्वाचा अधिकार आहे. त्यामुळे काही लोक दिवसाही स्वप्न पाहात असतात अशी खोचक टीका केलीय.