मी नेहमीच नाणारवासियांसोबत - उद्धव ठाकरे

नाणार प्रकल्प रद्द झाल्याने नाणारवासियांनी आनंद व्यक्त केला आहे

Updated: Mar 3, 2019, 01:34 PM IST
मी नेहमीच नाणारवासियांसोबत - उद्धव ठाकरे  title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली. स्थानिक रहिवाशांच्या तीव्र विरोधानंतर रद्द करण्यात आलेल्या नाणार प्रकल्पामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. रत्नागिरीमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाणारवासियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाणारमुळे निर्सगाला बाधा निर्माण होऊ नये, आंबा, काजूला नुकसान होऊ नये, निर्सगाची हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. यासाठीच हा प्रकल्प रद्द करत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांकडून प्रकल्प न होऊ देण्याची विनंती होत होती. त्याप्रमाणे मी माझा शब्द पूर्ण केला आहे. नाणारबाबत नेहमीच मी नाणारवासियांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरेंनी नाणार रद्द झाल्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेले राजपत्र नाणारवासियांना दिले. 

नाणारमधील पेट्रोलियम प्रकल्प रद्द झाल्यानंतर निलेश राणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. नाणार रद्द झाल्याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये. हा विजय शिवसेनेचा नाही तर हा विजय नाणार वासियांचा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्हातील पाच हजार ४५३ हेक्टर जमीन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६१ हेक्टर मूळ जमीन मालकांना परत मिळणार आहे.