सतीश मोहिते, झी मीडिया नांदेड : मन सुन्न करणारी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. नांदेडच्या श्रावस्ती नगरमध्ये राहणाऱ्या एका अंध दाम्पत्याच्या 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह नदीत आढळल्यावे खळबळ उडाली आहे.
अंकुश हट्टेककर आणि शितल हट्टेकर हे दाम्पत्य श्रावस्ती नगरमध्ये राहतं. अंकुश हट्टेकर हे रेल्वेत खाण्याचं साहित्य विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची 5 वर्षांची मुलगी 16 ऑगस्टपासून बेपत्ता होती. याप्रकरणी पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली होती.
आज वाजेगाव जवळील पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात आरोहीचा मृतदेह तरंगलेला आढळला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपीने मुलीची हत्या करुन मृतदेह नदीत फेकल्याचा संशय आहे. मुलीबरोबर काही गैरकृत्या करण्यात आलं आहे याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा मृतेदह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास सुरु आहे.