नांदेड : एमपीएससी परीक्षेचला गैरव्यवहाराचं प्रकरण ताजं असतानाच आता शिक्षकांच्या भरतीत गुण वाढवून देण्याचं आमिष दाखवणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. नांदेड जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या एका विद्यार्थ्याला गुण वाढवून देण्याचं संभाषण या क्लिपमध्ये आहे. कांशीराम चव्हाण नावाच्या व्यक्तीनं कल्पेश ठाकरे या विद्यार्थ्याला गुण वाढवून देण्याचं अमिष दाखवल्याचे या क्लिपच्या माध्यमातून प्रथमदर्शनी पुढे येत आहे.
डिसेंबर 2017 मध्ये शिक्षक भरती अभियोग्यता चाचणी परीक्षा झाली होती. या परिक्षेत 12 ते 15 लाखाच्या मोबादल्यात गुण वाढवून देण्याचा उल्लेख आहे...धक्कादायक म्हणजे यात नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे भाजप आमदापर तुषार राठोड यांच्या नावाचाही उल्लेख काशीराम चव्हाणनं केलाय. मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा राठोड यांनी केलाय. तसंच त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रारही दिलीय. तर दुसरीकडे डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशननं पोलीसांकडे तक्रार केलीय.
दरम्यान, या क्लिपमुळे शिक्षण क्षेत्रातला आणखी एखादा घोटाळा पुढे येतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या क्लिपची शेक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.