Rane Image on Coin : भारतातल्या चलनी नोटांवर (Indian Currency) महात्मा गांधीजींचा (Mahatma Gandhi) फोटो आहे. मात्र गांधीजींऐवजी नोटांवर महापुरुषांचे फोटो असावेत या मागणीसाठी अनेक पक्ष सरसावलेत. सर्वात आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) नोटांवर गणपती आणि लक्ष्मी असावेत अशी मागणी केली. त्यानंतर वेगवेगळे राजकारणी वेगवेगळी मागणी करु लागले. भाजप नेते राम कदम(Ram Kadam) यांनी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असावेत अशी मागणी करणारं ट्विट केलं. तर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा अशी मागणी केलीय.
राणे कुटुंबाचा फोटो व्हायरल
नोटांवर फोटोंवरुन नौटंकी सुरु असतानाच आता सोशल मीडियावर काही लोकांनी खोडसाळपणा केला आहे. नाण्यांवर राणे कुटुंबाचे फोटो टाकून ते व्ह्यारल करण्यात आले आहेत. चलनातून बाद झालेल्या 2 पैशांच्या नाण्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane), 5 पैशांच्या नाण्यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि 25 पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayn Rane) यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
हे फायनल करा
अज्ञात व्यक्तीने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यावर 'हे फायनल करा' असं लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) हे फोट व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पण हे फोटो नेमके कुणी तायर केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले याबाबत माहिती मिळालेली नाही.
पोलीस ठाण्यात तक्रार
भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते व्हायरल पोस्टविरोधात आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार असंवैधानिक असून खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन त्याच्याव कारवाई करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.